Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | 15 April 2025 | ABP Majha
नागपूरच्या शिक्षक भरतीत मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून १०० हून अधिक शिक्षकांची भरती, 2016 मध्ये सेवानिवृत्त झालेले शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या मृत्यूनंतरही सहीचा वापर,बोगस सहीद्वारे २०१६ ते २०२४ दरम्यान बोगस शिक्षक भरती,
नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल, ५८० अपात्र शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता, प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी २० ते ३५ लाख घेतल्याची सुत्रांची माहिती
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात दहा हजार पानांचे दोषारोपपत्र धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात दाखल, ड्रग्ज तस्करीत कोणाचे रोल काय, आरोपींचे जबाब, सीडीआरची दोषारोपपत्रात माहिती .
माजलगावमध्ये हत्या झालेला बाबासाहेब आगे भाजपचा पदाधिकारी, बूथ विस्तारक पदाची जबाबदारी सांभाळत होता, हत्येचं कारण अजून अस्पष्ट, पोलीस तपुास सुरू.
हिंगोलीत पैसे काढण्याच्या कारणावरून ग्राहक आणि बँक कर्मचाऱ्यामध्ये राडा, पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकाकडून बँक कर्मचाऱ्याला मारहाण, गुन्हा दाखल होण्याची शक्यता.
पुण्यात पुन्हा कोयत्याची दहशत, फ्लॅटच्या बुकिंगची रक्कम परत मागितल्याचा राग मनात ठेवत कोयता फिरवत दहशत माजवण्याचा प्रयत्न. उत्तम नगर भागातील घटना, गुन्हा दाखल.